माझी पहिली कविता

या महान देशाच्या नेत्यांचे विचार किती लहान,
तरीही आमचे निर्लज्ज नेते म्हणतात, "मेरा भारत महान" ||

भ्रष्टाचार आणि लोकसंख्या यांत प्रथम असण्याचा बहुमान,
आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधे मात्र कुठेच नाही स्थान,
कोणीही सत्तेवर आले तरी आश्वासनांचीच खाण,
तरीही आमचे निर्लज्ज नेते म्हणतात, "मेरा भारत महान" || १ ||

राष्ट्राचे हित खड्डयात गाडून सरकार पाडण्याचेच कारस्थान,
सामान्यांच्या जीवनाची करून टाकली धूळधाण,
क्रीडा, कला, संस्क्रृतीतही वाशिल्यालाच स्थान,
तरीही आमचे निर्लज्ज नेते म्हणतात, "मेरा भारत महान" || २ ||

सत्त्याची कांस धरण्यारांची उडवली दाणादाण,
देशद्रोह्यांना 'स्वामी' बनवून देती मानसन्मान,
धर्मांधतेच्या पायावर उभारले बंगले छान,
तरीही आमचे निर्लज्ज नेते म्हणतात, "मेरा भारत महान" || ३ ||

बडे बाप के बिघडे बेटे बनले आहेत 'बाबा' (संजू बाबा),
सामान्यांना मात्र सल्ला "अजून राबा अजून राबा",
सामान्यांच्या हिताची मात्र कुणास नाही जाण,
तरीही आमचे निर्लज्ज नेते म्हणतात, "मेरा भारत महान" || ४ ||

रोज नवी भानगड होते - कधी 'हवाला' कधी 'यूरिया',
चला, आता या क्षणीच आपण सर्व "पण" करूया,
देऊ मत त्यालाच, ज्याच्या नजरेत सर्व जण समान,
मगच खर्र्या अर्थाने म्हणता येईल, "मेरा भारत महान" || ५ ||

- Written on 14 October, 1996

Comments

Popular posts from this blog

Resize table columns of html table

का जगायचं? - पु.ल.

Write your name in japenese